गाडी एसी चालू केल्याने मायलेज कमी होतो का? किती इंधन लागते?

19 जुलै 2025

Created By:  राकेश ठाकुर

कार चालवताना उन्हाळ्यात एसीचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. तुम्हाला माहिती आहे का? एक तास एसीसाटी किती इंधन लागतं?

एसी जास्त वेळ चालवल्याने तुमच्या गाडीच्या मायलेजवर परिणाम होऊ शकतो. 

तुम्ही हॅचबॅक किंवा सेडानमध्ये एक तास एसी वापरला तर ताशी 0.2 ते 0.4 लीटर इंधन संपतं. तर एसयुव्हीमध्ये ताशी 0.5 ते 0.7 लीटर इंधन लागतं. 

कार एसी किती इंधन वापरते हे इतर घटकांवरही अवलंबून आहे. कार जितकी लहान तितकं इंजिन कमी शक्तिशाली असते. 

बाहेर तापमान जास्त असेल तर एसीला जास्त काम करावे लागेल. त्याचा मायलेजवरही परिणाम होईल. 

एसी चालू असताना वारंवार खिडक्या उघडल्या तर गाडी थंड होण्यास वेळ लागतो. त्यामुळे इंधन अधिक खपतं आणि मायलेजवर परिणाम होतो. 

शहरांमध्ये गाडी चालवताना ट्राफिकमध्ये वारंवार थांबावं लागते. त्यामुळे इंजिन अधिक काम करते आणि मायलेजवर परिणाम होतो. 

टेस्ला नावाचा अर्थ काय? एलोन मस्कने हेच नाव का निवडलं?