16 जुलै 2025
Created By: राकेश ठाकुर
अमेरिकन उद्योगपती एलोन मस्क यांच्या टेस्ला कंपनीने भारतात मॉडेल वाय कार लाँच केली आहे. या गाडीची किंमत 60 लाख आहे.
टेस्ला हे नाव स्लाव्हिक मूळाशी संबंधित असून त्याचा युरोपियन देशाशी संबंध आहे. चला नेमका अर्थ जाणून घेऊयात
टेस्ला या शब्दाचा अर्थ कुऱ्हाड किंवा कापण्याचे साधन असा होतो. लाकूड कापण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या हत्यारासाठी हा शब्द वापरला जातो.
एलोन मस्कने निकोला टेस्ला यांच्या सन्मानार्थ कंपनीचे नाव ठेवले. निकोला टेस्ला एक महान शास्त्रज्ञ आणि शोधकर्ते होते.
निकोला टेस्ला यांना वीज आणि मोटर तंत्रज्ञानाचे जनक मानले जाते. त्यांनी आधुनिक इलेक्ट्रिक मोटर्सचा पाया रचला.
निकोला टेस्ला यांनी वीज प्रकल्पांमध्ये वापरल्या जाणाऱ्या पर्यायी विद्युत प्रवाहाचा शोध लावण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
मिडिया रिपोर्टमधील दाव्यात असं सांगितलं जातं की, शास्त्रज्ञ निकोला व्यतिरिक्त टेस्ला हे नाव विज्ञान आणि उर्जेचं प्रतीक म्हणून निवडलं आहे.