पावसात बाइक चालवताना या चुका करू नका
2 जून 2025
Created By: राकेश ठाकुर
पावसात बाइक चालवताना काळजी घेणं गरजेचं आहे. टायर घासलेले आणि ग्रिप कमी असेल तर घसरून पडण्याची शक्यता असते.
ओल्या रस्त्यावर वेगाने बाइक चालवणं धोक्याचं ठरू शकतं. कारण ब्रेक लागायला वेळ लागतो आणि बॅलेन्स बिघडतो.
बाइक वेगात असेल आणि अचानक ब्रेक मारला तर स्किड होऊ शकते. पावसात कायम हळूहळू आणि नियंत्रणात ब्रेक लावा.
पाणी साचल्याने खड्डे दिसत नाहीत. त्यामुळे बाइकचा बॅलेन्स बिघडू शकतो. तसेच इंजिनमध्ये पाणी जाऊ शकते.
रेनकोट, रेन शू कवर किंवा हेल्मेट शील्डशिवाय बाइक चालवल्याने भिजणारच नाही तर विजनदेखील कमी होतं.
पावासमुळे हेल्मेटवर पाणी पडल्याने पुढचं स्पष्ट दिसणं कठीण होतं. अशावेळी बाइकचा स्पीड अधिक असणं महागात पडू शकतं.
पावसाळ्यापूर्वी ब्रेक, चेन, लाइट्स आणि इलेक्ट्रिकल वस्तूंची तपासणी करून घ्या. अन्यथा वाटेतच बाइक बंद पडू शकते.
दुधात मनुके भिजवून खाणं महिलांसाठी आरोग्यवर्धक, का ते जाणून घ्या
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा