दुधात मनुके भिजवून खाणं महिलांसाठी आरोग्यवर्धक, का ते जाणून घ्या

2 जून 2025

Created By:  राकेश ठाकुर

दुधात व्हिटॅमिन बी12, व्हिटॅमिन डी, प्रोटीन, कॅल्शियम अशी पोषक तत्व असतात. तसेच मनुक्यात आयर्न, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, मॅग्निशियम असे घटक असतात.

मनुके पाण्यात भिजवून खाल्ले जातात. पण दुधात भिजवून किंवा उकळवून खाणं महिलांसाठी आरोग्यवर्धक आहे. 

महिलांमध्ये रक्ताची कमतरता दिसून येते. दूध आणि मनुके एकत्र खाल्ल्याने हिमोग्लोबिन वाढतं. कारण मनुक्यात आयर्न आणि दुधात बी12 असतं. 

मेनोपॉजनंतर महिलांची हाडं कमकुवत होण्याची समस्या जाणवते. यासाठी मनुके आणि दूध एकत्र खाणं आरोग्यवर्धक ठरतं. 

महिलांमध्ये मेनोपॉजचं वय हे 45 ते 50 मध्ये असते. त्यावेळेस आरोग्याची काळजी घेणं आवश्यक आहे. मनुके आणि दूध एकत्र खाल्ल्याने फायदेशीर ठरतं.

दुधात भिजवलेले मनुके खाल्ल्याने झोप चांगली लागते. तसेच स्ट्रेबस कमी राहतो. तसेच स्किनही चांगली राहते. हृदयाचं आरोग्य सुधारतं. 

रोज दुधासोबत 10 ते 15 मनुके खाऊ शकता. पण मधुमेह असलेल्यांनी मनुके शक्यतो खाऊ नयेत. 

पावसात बाइक चालवताना या चुका करू नका