येत आहेत शानदार हायब्रिड Family बजेट कार, मायलेज पण दमदार

22 July 2025

Created By: Atul Kamble

 जर तुम्ही चांगल्या मायलेजसह पर्यावरण स्नेही फॅमिली कार घेऊ इच्छीत आहेत,तर पुढच्या वर्षी मारुती,हुंडई, किया आणि रेनो या कंपन्या बाजारात येत आहेत

 २०२६-२७ मध्ये हायब्रिड फॅमिली कार लाँच होत आहेत.या कार स्टाईल, आराम आणि टेक्नॉलॉजीत आधुनिक असतील

 मारुती मिनी MPV -मारुती सुझुकीची ही कार जपानच्या सुझुकी Spacia पासून प्रेरित असेल.यात 1.2 लिटर Z-सिरीज पेट्रोल-हायब्रिड इंजिन असेल.जे 35kmpl पेक्षा जास्त मायलेज देईल.शहरासाठी कॉम्पॅक्ट कार असेल

यात स्लाईडिंग डोअर आणि ADAS सारख्या आधुनिक सुविधा नसतील,किंमतीत ही कार एक व्हॅल्यू फॉर मनी ऑप्शन असेल

किया सेल्टोस हायब्रिड-या गाडीत नवे बदल असतील याचे डिझाईन इंटरनॅशनल मॉडेल Sportage SUV सारखे असेल आणि फिचर्स अपग्रेड असतील.१.५ लिटर पेट्रोल-हायब्रिड इंजिन मिळेल.

 रेनो डस्टर हायब्रिड मॉडेलमध्ये १.६ लिटर पेट्रोल इंजिनसह दोन इलेक्ट्रीक मोटर  आणि १.२ kWH बॅटरी पॅक असेल.इंजिन १४० bhp ताकदीचे असेल. शहर आणि हायवे दोन्ही साठी बेस्ट

हुंडई क्रेटा हायब्रिड सुव्ह २०२७ मध्ये येणार आहे. यात १.२ लीटरचे पेट्रोल-हायब्रिड इंजिन असण्याची शक्यता आहे.तसेच सध्याचे पेट्रोल,टर्बो आणि डिझेल इंजिनाचे ऑप्शनही असेल