EV च्या धडाक्यातही हायब्रिड कारचा जलवा, या 5 कारची जोमाने विक्री
भारत ग्रीन मोबिलिटीच्या दिशेने जात आहे.पेट्रोल-डिझेल कारच्या ऐवजी सीएनजी, ईव्ही आणि हायब्रिड कारना देखील मागणी वाढली.
एकीकडे इलेक्ट्रीक वाहनांची चर्चा होत असतानाच, हायब्रिड कारची मागणी वाढत आहे.
गेल्या आर्थिक वर्षात काही हायब्रिड कारने चांगली कामगिरी केली आहे. चला तर टॉप-5 बेस्ट सेलिंग हायब्रिड कारची यादी पाहूयात
किंमत :10.50 लाख
मारुती व्हिटोरिसच्या हायब्रिड व्हेरिएंटमध्ये 1.5 लिटर पेट्रोल इंजिन मिळते. जे सुमारे 28.65 किमी/लिटरचे मायलेज देते.
5.Maruti Victoris
3,247 युनिट्ची विक्री - गेल्या आर्थिक वर्षात कंपनीने या हायब्रिड व्हेरिएंटचे एकूण 3,247 युनिट विकले.जे सुमारे 2.6% मार्केट शेअर करते.
4.Maruti Invicto
किंमत :24.97 लाख
इनोव्हा हायक्रॉसवर बेस्ड इन्विक्टोमध्ये 2.0 लिटर पेट्रोल हायब्रिड इंजिन येते. ही सात आसनी कार सुमारे 22 किमी/ लिटरचा मायलेज देते.
4.Maruti Invicto
गेल्या आर्थिक वर्षात मारुती इन्विक्टोच्या एकूण 5,350 युनिट्स विक्री झाल्या. जी हायब्रिड सेगमेंटमध्ये सुमारे 4.2 टक्के मार्केट शेअर राखते.
3.Maruti Grand Vitara
किंमत:10.77 लाख
मारुती ग्रँड व्हिटारातही 1 लिटरचे हायब्रिड इंजिन मिळते.ही 5-आसनी फॅमिली एसयुव्ही सुमारे 20 किमी/लिटर मायलेज देते.
3.Maruti Grand Vitara
11,739 युनिट
आर्थिक वर्षे 26 मध्ये कंपनीच्या हायब्रिड व्हेरिएंडच्या एकूण 11,739 युनिट्स विकले आहेत. जे हायब्रिड सेगमेंटमध्ये 9.3 टक्के मार्केट शेअर राखते.
2.Toyota Hyryder
किंमत:10.99 लाख
टोयोटा हायरायडर मध्ये 1.5 लिटरचे पेट्रोल इंजिन आहे.ही पाच आसनी हायब्रिड कार सुमारे २७ किमी/लिटर मायलेज देते.
2.Toyota Hyryder
35,7452 युनिट्स
गेल्या आर्थिक वर्षात टोयोटा हायरायडरच्या एकूण 35,7452 युनिट्स विकल्या गेल्या. दुसऱ्या क्रमांकावरील या एसयुव्हीने 8.4टक्के मार्केट शेअर केले आहे.
1.Toyota Innova Hycross
किंमत:18.70 लाख
टोयोटा इनोव्हा हायक्रॉसमध्ये 2.0 लिटर पेट्रोल इंजिन आहे. ही कार 7 आणि 8 सिटर कॉन्फिगरेशनमध्ये येते.हीचा हायब्रिड व्हेरिएंड 22 किमी/लिटरचे मायलेज देते.
1.Toyota Innova Hycross
गेल्या आर्थिक वर्षात टोयोटा इनोव्हा हायक्रॉसच्या एकूण 62,586 युनिट्स विक्री झाल्या. हायब्रिड सेगमेंटमध्ये मार्केट शेअर 49.7 टक्के आहे.