Created By: Atul Kamble

03 May 2026

घर खरेदी करण्यापूर्वी या 5 गोष्टींची काळजी घ्या, अन्यथा होईल फसवणूक

 प्रॉपर्टी खरेदी करण्याआधी तुम्ही नीट चौकशी केली आहे की नाही याची खातरजमा करा.

जी प्रॉपर्टी तुम्ही खरेदी केली आहे ती कायदेशीररित्या योग्य आणि वादग्रस्त नाही ना याची काळजी घ्या.

घर विकणारा त्याचा खरा मालक आहे की नाही आणि त्याला ते घर विकण्याचा अधिकार आहे की नाही हे पाहा

सर्व कागदपत्रे, आधीच्या घर विक्री करार, रजिस्ट्रेशन, नोंदणी शुल्क, संपत्ती कर भरल्याच्या पावत्या सर्वांची वकीलाशी बोलून खातरजमा करा.

गेल्या तीस वर्षाचे त्या घराचे रेकॉर्ड तपासा आणि जमीनीचा कोणताही वाद तर नाही ना, कर्ज नाही ना याची चौकशी करावी.

विश्वासार्ह प्रॉपर्टी एजंटकडूनच घर खरेदी करावे, त्या एजंटची त्या भागातील प्रतिमा कशी आहे याची चौकशी करावी.

घरमालकाला भेटून त्याची कागदपत्रे निट तपासावीत,त्याची ओळख पटवून घ्यावी

शेजाऱ्यांशी बोलून घराचा काही वाद, काही समस्या नाहीत ना याची काळजी घ्यावी.