TESLA पदरी बाळगणं सोपं नाही,या एका फिचरची किंमत 6 लाख

18 July 2025

Created By: Atul Kamble

टेस्ला अखेर भारतीय बाजारात दाखल झालीय,१५ जुलै रोजी पहिली इलेक्ट्रीक कार Tesla Model Y लाँच केली आहे

 जगभरात चांगला परफॉर्मन्स आणि टेक्नॉलॉजीसाठी प्रसिद्ध ही कार स्टँडर्ड आणि लाँग रेंज अशा दोन व्हेरीएंटमध्ये येत आहे

स्टँडर्ड व्हेरीएंटची सुरुवातीची किंमत ५८.९८ लाख आणि लाँग व्हर्जनची किंमत ६७.८९ लाख रु.( एक्स शोरुम दिल्ली ) आहे

दिल्लीत या दोन कारची ऑन रोड किंमत अनुक्रमे ६२.०३ लाख आणि ७०.११ लाख ( जीएसटीसह ) रुपये आहे

एकाहून एक फिचर असलेल्या या ईकार मध्ये फुल सेल्फ-ड्रायव्हिंग फंक्शन देखील आहे.ड्रायव्हर विना ही कार चालू शकते

 या फुल सेल्फ-ड्रायव्हिंग फंक्शनसाठी ६ लाख अतिरिक्त चार्ज आहे.यासाठी बुकींगसुद्धा सुरु आहे.

एका बातमीनुसार हे फुल सेल्फ-ड्रायव्हिंग फंक्शनसह मुंबईत काही जणांनी ही कार बुक केली आहे.

परंतू भारतात ऑटोनॉमस वा ड्रायव्हर लेस कार चालवायला मंजूरी नाही.त्यामुळे भारतात या फिचर वापर होईल की नाही याबाबत संशय आहे

 तरीही पार्किंगसाठी हे फिचर कामी येईल असे म्हटले जातेय.भारतात काही कारमध्ये सेल्फ पार्किंग वा पार्किंग असिस्टसारखे फिचर आहे

ही कार दोन बॅटरी पॅक ( 60kWh आणि 75kwh)सह येते.छोटा पॅक सिंगलचार्जला 500 km आणि मोठा बॅटरी पॅक 622km रेंज देते

बेस व्हेरीएंट 5.9 सेंकदात 0 ते 100 किमी प्रतितास वेग पकडतो.लाँग रेंज हा पकडायला 5.6 सेंकद घेतो.हीचा टॉप स्पीड 201 किमी प्रतितास इतका आहे