14 october 2025
Created By: Atul Kamble
मारुती सुझुकी स्वस्त कार Alto K10 नव्या जीएसटी रचनेत आणखीन स्वस्त झालीय.आता या कारची सुरुवातीची किंमत 3.70 लाख आहे
मारुती सुझुकी या छोट्या कारला जीएसटी कपातीनंतर आणखी डिस्काऊंट देत आहे. दिवाळीमुळे ही सूट दिली जात आहे.
Alto K10 खरेदीवर 55,500 रुपयांपर्यंत सुट मिळू शकते. कॅश ऑफर,एक्स्चेंज बोनस आणि स्क्रॅपेज बोनसचा देखील यात समावेश आहे.ग्रामीण खरेदीदारांना 2,500 रु.आणखी एक्स्ट्रा डिस्काऊंट आहे.
दिल्लीत Alto K10 ची ऑनरोड किंमत 4.11 ते 6.04 लाखादरम्यान आहे. हीची एक्स -शोरुम किंमत 3.70 लाख ते 5.45 लाखापर्यंत आहे.
टॉप मॉडेल Alto K10 VXi Plus (0)AGS ची किंमत 6.04 लाख आहे. LXi(0)s-CNG व्हर्जनची किंमत 5.35 लाखापासून सुरु होते.
हीचे टॉप CNG व्हेरिएंट,VXi(0)s-CNG ची किंमत 5.90 लाख रुपयात येते.Alto K10 CNG केवळ मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये उपलब्ध आहे.
सर्वात स्वस्त ऑटोमॅटीक Alto K10 (AMT गिअरबॉक्स) ची किंमत 5.49 लाख रु.आहे.पेट्रोल इंजिनच्या टॉप ऑटोमॅटीक व्हेरिएंट VXi Plus (0) AGS ची किंमत 6.04 लाख आहे.
GST 2.0 मध्ये Alto K10वर 1 लाख रुपयांपर्यंत कपात झाली आहे.सर्वात जास्त स्वस्त LXi(0) आणि बेस मॉडेल Std (0)सर्वात कमी स्वस्त झाले आहे