महिला पुरुषांपेक्षा जास्त सोने  घरात ठेवू शकतात का ?

13 october 2025

Created By: Atul Kamble

सध्या दिवाळीची खरेदी सुरु आहे. सोन्याचे दर प्रचंड आहे. तरी सोने खरेदी होणारच..मात्र घरात कायदेशीरपणे किती सोने ठेवता येते ? 

भारतात सोने बाळगण्यासंदर्भात फिक्स कायदा नाही.सोने लिगम इन्कमने खरेदी केलेले हवे. टॅक्स लपवण्यासाठी काळ्या पैशाने खरेदी केलेल्या सोन्यावर कारवाई होऊ शकते

CBDT ची गाईडलाईननुसार काही मर्यादेपर्यंत सोने जप्त केले जात नाही.मग भलेही खरेदीच्या पावत्या नसतील.हे सोने नॉन-सीजेबल मानले जाते. 

विवाहित महिलांना ५०० ग्रॅम आणि अविवाहित महिलांना २५० ग्रॅमपर्यंत सोने बाळगण्याची मूभा आहे.या मर्यादेपर्यंत सोने जप्त केले जात नाही.

पुरुषांसाठी नॉन-सीजेबल सोन्याची मर्यादा १०० ग्रॅम आहे. म्हणजे बिला शिवाय १०० ग्रॅम सोने सुरक्षित मानले जाते.

जर तुमच्याकडे खरेदीच्या पावत्या वा वारशाची कागदपत्रे असतील तर लिमीटच्या बाहेरही सोने कायद्याने बाळगता येते. परंतू हे सोने लिगल इन्कम किंवा वारशाने मिळालेले आहे हे सिद्ध व्हायला हवे

इन्कम टॅक्सने छापा मारला आणि तुमच्याकडे गोल्डच्या सोर्सचा पुरावा नसेल तर लिमिटच्या आतील सोने जप्त होत नाही.

महिलांना पुरुषांच्या तुलनेत जास्त सोने बाळगण्याची सूट आहे. परंतू लिगल इन्कम वा वारशाची कागदपत्रे नेहमी सांभाळून ठेवावी