21 october 2025
Created By: Atul Kamble
मारुती सुझुकी डिझायर जेव्हापासून नव्या अवतारात लाँच झाली आहे, तेव्हापासून ही बेस्ट सेलिंग कार ठरली.आता जीएसटी कटमुळे ती 88,000 रुपये स्वस्त झाली
मारुती सुझुकी डिझायरच्या zxi Plus टॉप मॉडेलवर सर्वाधिक 88,000 रुपयांची सुट मिळत आहे. याच वेळी स्विफ्ट हॅचबॅकलाही जीएसटी सूट मिळाली आहे.
डिझायर मॅन्युअल आणि AMT ( ऑटोमेटेड मॅन्युअल ट्रान्समिशन ) दोन्हीत उपलब्ध आहे.याच्या AMT व्हेरिएंट्सवर 72,000 ते 88,000 रु.पर्यंत जीएसटी सूट मिळत आहे.
नव्या पिढीच्या डिझायरमध्ये अनेक डिझाईन आणि फिचर अपग्रेड्स केले आहेत.आता यात नवीन 1.2 लिटर Z सिरीज,3-सिलेंडर पेट्रोल इंजिन आहे.
नव्या इंजिनसह डिझायरने ग्लोबल आणि भारत दोन्ही NCAP टेस्टमध्ये 5-स्टार सेफ्टी रेटींग मिळवले असून असे करणारी ही पहिली मारुती सुझुकी आहे.
डिझायरमध्ये प्रशस्त ड्रायव्हींग सीट,पाच लोकांसाठी पर्याप्त जागा,आणि ज्यादा मायलेजसाठी सीएनजीचा पर्याय आहे.
नवीन डिझायर आता फॅक्ट्री -फिटेड सीएनजी किटसह देखील येते आणि पेट्रोलवरही चालते. डिझायर टॅक्सी सेगमेंटमध्ये आधीच खूप लोकप्रिय आहे.
मारुती सुझुकी डिझायरच्या ZXi प्लस आणि ZXi प्लस AMT व्हेरिएंटमध्ये सनरुफ आहे.हे डिझायरचे टॉप-एंड मॉडेल आहे. सीएनजीचा पर्याय देखील आहे.