6 एअरबॅगवाल्या स्वस्त कार पाहा, 3.70 लाखापासून किंमत, 34km चे मायलेज...

13 DEC 2025

 आधी सहा एअरबॅग केवळ महागड्या कारमध्येच असायच्या, परंतू आता एण्ट्री लेव्हल कारमध्येही हे फिचर मिळत आहेत.

Citron C3 (किंमत:4.80 लाख) या कारला 6 एअरबॅगसह अपडेट केले आहे.1.2 लिटर पेट्रोल इंजिनची ही कार 18 किमी/ लिटर पर्यंत मायलेज देते

निसान मॅग्नाइट ( किंमत:5.62 लाख) यात सहा एअरबॅग्ज आहेत.1.0-लिटरचे 3-सिलेंडर पेट्रोल इंजिन आहे.ही कार 17-19 किमी/लिटर मायलेज देते.

हुंडई एक्स्टर   (किंमत :5.49 लाख ) यात सहा एअरबॅग्ज आणि 1.2-लिटर इंजिन आहे. पेट्रोल व्हेरिएंट  19 किमी/लिटर आणि  CNG व्हेरिएंट 27 किमी/किग्रॅमचे माइलेज देते.

हुंडई ग्रँड i10  (  किंमत:5.47 लाख) यात सहा एअरबॅग्ज आणि 1.2-लिटर पेट्रोल इंजिन आहे. ही कार पेट्रोल व्हेरिएंट 18 किमी/लिटर आणि CNG व्हेरिएंट 27 किमी/किग्रॅमचे मायलेज देते.

 मारुती वॅगनआर (किंमत:4.99 लाख) याला 6 एअरबॅगने अपडेट केले आहे. याचे पेट्रोल मॉडेल 24 किमी आणि सीएनजी 34 किमीचे पर्यंत मायलेज देत.

मारुती सेलेरियो ( किंमत:4.70 लाख) यातही 6 एअरबॅग आहेत. 1.0 लिटर पेट्रोल इंजिनवाली ही कार 25 किमी/लिटर आणि CNG व्हेरिएंट 34 किमी/किग्रॅमचे मायलेज देते.

मारुती अल्टो K10  ( किंमत:3.70 लाख) -यात  6 एअरबॅग आहेत.पेट्रोल व्हेरिएंट 25 किमी/लिटर आणि CNG व्हेरिएंट 33.85 किमी/किग्रॅम मायलेज देते.