ही आहे जगातील सर्वात महागडी कार, कोण आहे मालक ?

29 october 2025

Created By: Atul Kamble

जगातल्या महागड्या कारचे नाव रोल्स-रॉयस ला रोझ नॉयर ड्रॉपटेल असे आहे.

ही एक लिमिटेड एडीशन कार आहे, ज्यास रोल्स-रॉयसने बनवले आहे.

जगातल्या या सर्वात महागड्या कारचा मालक कोण आहे, याची माहिती गुप्त ठेवण्यात आली आहे.

या कारला जुलै २०२५ मध्ये कॅलिफोर्नियातील पेबल बिचमध्ये एका खाजगी समारंभात तिच्या मालकाकडे सोपवण्यात आले आहे.

या कारची किंमत सुमारे ३० दशलक्ष डॉलर म्हणजे २५० कोटी रुपये आहे.

या कारमध्ये केवळ दोन सिट आहेत. त्यामुळे कारला एक क्लासिक रोडस्टर लुक मिळतो.

ही कार ० ते ९७ किलोमीटर प्रति तासाचा वेग केवळ ४.८ सेंकदात पकडू शकते.

रोल्स-रॉयस ड्रॉपटेलच्या जगात केवळ चार युनिट्स तयार केल्या जाणार आहेत.

प्रत्येक कार त्याच्या मालकाच्या इच्छेनुसार कस्टमाईज केली जाणार आहेत.