भारतात लाँच झाली सर्वात स्वस्त 7 सिटर कार, पाहा किंमत काय ?

23 July 2025

Created By: Atul Kamble

 रेनॉ इंडियाने ट्रायबर फेसलिफ्टला लाँच केले आहे.ही कार २०२५ मध्ये खूप साऱ्या अपडेटने आली आहे

रेनॉ ट्रायबर फेसलिफ्ट कारचे पुढचे आणि मागचे डिझाईन बदलले आहे. ज्यादा फिचर्स आहेत

हे भारतात रेनॉचे पहिले मॉडेल आहे. ज्यात नवा लोगो दिला आहे.आता कार जास्त स्टायलिश झाली आहे.

नव्या ट्रायबर फेसलिफ्ट कारचा पुढचा लूक खूपच बदलला आहे. यात नवी काळी ग्रिल आहे

 बम्परला नवे डिझाईन दिले आहे. आणि या मोठा एअर इनटेक दिला आहे.हेडलँम्पमध्ये बदल आहेत

 पाठीमागे काळी गार्निश दिला असून टेल लाईट्सचे डिझाईनही बदलले आहे.

नव्या ट्रायबर फेसलिफ्ट कारची किंमत ६.३० लाखापासून सुरु होते ते ९.१७ लाख ( एक्स-शोरुम ) पर्यंत जाते.