एका कमजोर पासवर्डने बुडाली 158 वर्षे जुनी कंपनी,700 लोकांची नोकरी गेली
23 July 2025
Created By: Atul Kamble
पासवर्ड बनवताना आपण सोपा पासवर्ड बनवतो, परंतू हा सोपा पासवर्ड धोका देऊ शकतो
सायबर तज्ज्ञ नेहमी सांगत असतात स्ट्राँग पासवर्ड बनवा. पंरतू लक्षात राहत नसल्याने अनेक जण सोपा पासवर्ड बनवतात
तुमच्या सोप्या पासवर्डचा परिणाम काय होऊ शकतो याचे उदाहरण KMP लॉजिस्टीक ग्रुप आहे
एका कर्मचाऱ्याच्या कमजोर पासवर्डमुळे १५८ वर्षे जुन्ही कंपनी बंद पडली. हॅकर्सनी या कर्मचाऱ्याच्या पासवर्डच्या मदतीने कंपनीच्या डेटाबेसचा एक्सेस मिळवला
त्यानंतर हॅकरने सर्व कर्मचाऱ्यांना सिस्टीमच्या बाहेर काढले.संपूर्ण डेटावर कब्जा केला. या डेटाच्या बदल्यात ५० लाख पाऊंड खंडणी मागितली.
कंपनी पैसे देण्यास असमर्थ होती. आणि कंपनीने नकारही दिला.डेटा नसल्याने कंपनीने कामकाज बंद केले
यामुळे ७०० कर्मचाऱ्यांची नोकरी गेली. बॅकअप देखील कामाला आला नाही. कंपनीचा डेटा पुन्हा मिळाला नाही.
हे ऐतिहासिक प्रकरण आहे. ज्यामुळे स्ट्राँग पासवर्डची गरज का आहे हे कळते. डिजिटल वर्ल्डमध्ये पासवर्ड तुम्हाला सुरक्षित ठेवू शकतो
जर तुम्हाला पासवर्ड लक्षात ठेवता येत नसेल तुम्ही पास की किंवा पासवर्ड मॅनेजरचा वापर करु शकता.
रतन टाटांपासून कपिल सिब्बल यांच्यापर्यंत हॉर्वर्डमध्ये शिकलेत हे भारतीय ?