रतन टाटांपासून कपिल सिब्बल यांच्यापर्यंत हॉर्वर्डमध्ये शिकलेत हे भारतीय ?
23 July 2025
Created By: Atul Kamble
हॉर्वर्ड युनिव्हर्सिटीतून शिकणे अनेकांचे स्वप्न असते.अमेरिकेतील मॅसाच्युसैट्समधील ही संस्था सर्वात प्रतिष्ठीत असून किती भारतीय येथून शिकलेत ते पाहूयात
राहुल बजाज यांना पद्मभूषण मिळाला होता. बजाज ग्रुपला त्यांनी ऊर्जितावस्था आणली, हॉर्वर्ड बिझनस स्कूलमधून त्यांनी एमबीए केले
परोपकारी उद्योगपती रतन टाटा यांनी कॉर्नेल युनिव्हर्सिटीतून आर्किटेक्चर शिक्षण घेतले होते.नंतर हॉर्वर्ड बिझनस स्कूलमधून एडव्हान्स मॅनेजमेंट प्रोग्रॅम पूर्ण केला
दिग्दर्शक मीरा नायर यांनी हॉर्वर्डमधून व्हीज्युअल आणि एन्हार्यमेंटल स्टडीत मास्टर डिग्रीसाठी स्कॉलरशीप मिळाली होती
आशीष नंदा इंडियन इंन्स्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट, अहमदाबादचे माजी संचालक होते. हार्वर्डमधून त्यांनी इकॉनॉमिक्समध्ये एमए आणि बिझनस इकॉनॉमिक्समध्ये पीएचडी मिळवली
कपिल सिब्बल सुप्रीम कोर्टात ज्येष्ठ विधीज्ज्ञ असून दिल्लीच्या सेंट स्टीफन्स कॉलेजमधून ते ग्रॅज्युएट झाले.नंतर हॉर्वर्ड लॉ स्कूलमधून एलएलएमची डिग्री घेतली.
हॉर्वर्ड युनिव्हर्सिटीत प्रवेश मिळणे एखाद्या स्वप्नासारखे आहे.या भारतीयांनी कठोर परिश्रम आणि बुद्धीमत्तेच्या जोरावर येथे स्थान मिळवले