Hero Super Splendor बाजारात आली, 72Kmpl मायलेज, किंमत किती ?
Created By: Atul Kamble
28 May 2026
हीरो मोटोकॉर्पने नवीन सुपर स्प्लेंडर XTEC 2.0 लाँच केली आहे. यात नवीन इलेक्ट्रॉनिक फिचर्स आणि डीझाईन आहे.
नवीन सुपर स्प्लेंडर XTEC 2.0 नवे तंत्रज्ञान, फिचर्स, स्टाईल आणि बदलामुळे बाईक जास्त प्रीमियम आणि स्मार्ट दिसते.
या बाईकमध्ये 124.7cc चे सिंगल सिलिंडर एअर कुल्ड इंजिन आहे. हे इंजिन 7500 rpm वर 10 हॉर्सपॉवर शक्ती आणि 6000 rpm वर 10.6 Nm चे कमाल टॉर्क जनरेट करते.
हीरोचा दावा आहे की ही बाईक 72 किमी प्रति लिटरचा मायलेज देते. यात प्रोग्रॅम्ड फ्यु्अल इंजेक्शन आणि आयडल स्टॉप-स्टार्ट सिस्टीचा वापर केला आहे. सुरुवातीची एक्स शोरुम किंमत 86,500 रुपये आहे.
नव्या बाईकमध्ये इंटीग्रेटेड स्टार्टर जनरेट म्हणजे ISG तंत्रज्ञान आहे.या फिचरमुळे इंजिन शांतपणे स्टार्ट होते.APFI आणि i3S सिस्टीम ट्रॅफीकमध्ये स्मूद रिस्टार्ट अनुभव देखील देते.
सुरक्षेसाठी बाईकमध्ये पहिल्यांदा हॅझर्ड लाईट फिचर दिले आहे.याशिवाय फ्रंट डिस्क ब्रेक, टेलिस्कोपिक फ्रंट सस्पेंशन, हँडलबारवर इंजिन किल स्विच आणि संपूर्ण डिजिटल इंस्ट्रुमेंट क्लस्टर देखील मिळते.
डिजिटल डिस्प्लेमध्ये ब्ल्यूटुथ कनेक्टीव्हीटीमुळे कॉल, एसएमएस आणि फोन बॅटरी अलर्ट मिळतो. यात रिअल टाईम मायलेज इंडिकेटर, लो फ्युअल वार्निंग आणि स्मार्टफोन चार्जिंगसाठी USB Type-C पोर्ट आहे.
- नव्या सुपर स्प्लेंडर XTEC 2.0 ला ड्युअल-टोन ग्राफीक्स आणि नव्या डिझाईनसह सादर केले आहे. पाच रंगात बाईक उपलब्ध आहे. ज्यात ग्लॉसी ब्लॅक, कँडी रेड, मॅट ग्रे, मॅट ब्ल्यू आणि मॅट ब्राऊन रंगाचा समावेश आहे.