Created By: Atul Kamble

नव्या होंडा सिटीत झाले हे 5 बदल, किंमत किती ?

Created By: Atul Kamble

26 May 2026

नवी होंडा सिटी कार दाखल झाली आहे. या कारमध्ये कंपनीने नवे डिझाईन आणि फिचर्समध्ये अनेक अपडेट दिले आहेत.सुरुवातीची एक्स शोरुम किंमत 12 लाख आहे.

जास्त प्रीमियम लूक - नव्या कनेक्टेड LED DRL,Bi-LED हेडलँप आणि ब्लॅक मॅट्रिक्स ग्रिल कारला जात स्टायलीश बनते.

 पाठच्या भागात बदल - नव्या LED टेललाईट, स्पॉयलर आणि अपडेटेड बंपर देण्यात आले आहे.कारआधी पेक्षा 11mm लांब झाली आहे.

आता Honda City त नवा crystal black pearl कलर देखील मिळणार आहे,एकूण 6 रंगाचा पर्याय दिला आहे.

केबिनमध्ये नवा प्रीमियम टच - ड्युअल-टोन ivory-black थीम, एम्बिएंट लायटिंग आणि आरामदायक रिअर सीट्ससह चांगला अनुभव मिळेल.

 मोठा स्क्रीन आणि स्मार्ट फिचर्स - 10.1 इंचाचा टचस्क्रीन, वायरलेस android auto आणि apple carplay, वायरलेस चार्जर सारखे फिचर्स दिले आहेत.

 फ्रंट व्हेंटिलेटेड सीट्सची कुलिंग 40 टक्के चांगली झाली आहे.सनरुफ आणि रिमोट AC सारखे फिचर्स देखील मिळतात.

सेफ्टीत मोठी अपडेट - 6 एअरबॅग, ADAS आणि आता नवा 360 डिग्री कॅमेरा देखील दिला आहे. हायब्रिड मॉडेलची किंमत 21 लाखापर्यंत पोहचते.