टाटा मोटर्सने काही महिन्याआधी प्रिमीयम हॅचबॅक अल्ट्रोज अपडेट केली आहे. हे मॉडेल पेट्रोल, डिझेल आणि CNG मध्ये उपलब्ध आहे.
खास बाब म्हणजे टाटा अल्ट्रोज इंडियाची एकमेव हॅचबॅक कार असून ती डिझेल इंजिनासोबत येते. याची सुरुवातीची किंमत 6.30 लाख रुपये आहे.
टाटा अल्ट्रोजच्या डिझेल मॉडेलची एक्स शोरुम किंमत 8.09 लाख रुपयांनी सुरु होते. डिझेल इंजिनची 3 मॉडेल्स आहेत.
टाटा अल्ट्रोजला तीन पॉवरट्रेन पर्यायांसह सादर केले आहे.1.2L रेव्होट्रॉन पेट्रोल इंजिन, 1.2L iCNG इंजिन आणि 1.5L रेव्होटॉर्क डिझेल इंजिन
टाटा अल्ट्रोज चार वेगवेगळ्या मॉडेलस्मार्ट, प्युअर, क्रिएटीव्ही आणि एक्म्प्लीश्ड S खरेदी केले जाऊ शकते.यात अनेक नवीन फिचर्सचे ऑप्शन आहेत.
अल्ट्रोज Pure आणि Creative मॉडेलमध्ये डिझेल AMT देखील उपलब्ध आहे.
टाटा अल्ट्रोजच्या डिझाईनमध्ये जास्त बदल केलेला नाही, परंतू आता या सेगमेंटमध्ये पहिल्यांदा फ्लश डोअर हॅडल्स लावले आहेत.जे कर्व्हमध्येही मिळतात.
नव्या अल्ट्रोजमध्ये अपडेटेड LED हेडलाईट्स,रिफ्रेश्ड ग्रिल, नवीन बंपर, नवीन डिझाईनचे 16 इंचीच्या एलॉय व्हील आणि कनेक्टेड LED टेल-लाईट्ससह नवा लूक मिळाला आहे.