Created By: Atul Kamble

21 May 2026

 या हायब्रिड कारचा बाजारात दबदबा, बनवला विक्रीचा नवा रेकॉर्ड

 टोयोटा किर्लोस्कर मोटरने भारतात हायब्रिड कारच्या विक्रीचा विक्रम केला. 3 लाख युनिटच्या विक्रीचा आकडा पार केला आहे.

 कंपनीने म्हटले आहे की हा विक्रम भारताच टिकाऊ आणि पर्यावरणच्या अनुकूल मोबिलिटीला प्रोत्साहन देण्याच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल आहे.

 टोयाटाची सेल्फ-चार्जिंग हायब्रिड इलेक्ट्रीक व्हेईकलने SHEV टेक्नॉलॉजी भारतीय ग्राहकांमध्ये वेगाने विकसित होत आहे.

 जास्त मायलेज, कमी प्रदुषण, सोपा वापर आणि शानदार ड्रायव्हिंग अनुभव या कारची लोकप्रियता वाढवण्यास कारणीभूत ठरले आहेत

कंपनीच्या मते Toyota गेल्या 30 वर्षात जगभरात हायब्रिड तंत्रज्ञानावर सतत काम करत आहे.  

 भारतात Toyata Urban Cruiser Hyryder, Innova Hycross, Camry Hybrid आणि vellfire सारखे हायब्रिड मॉडेल विकत आहे.

Toyata च्या हायब्रिड तंत्रज्ञानात पेट्रोल इंजिन आणि इलेक्ट्रीक मोटर एकत्र काम करते.ज्यात बॅटरीला स्वतंत्र चार्ज करण्याची गरज पडत नाही.  

कंपनीने ग्राहकांचा विश्वास वाढण्यासाठी तिच्या हायब्रिड बॅटरीवर 8 वर्षांची वॉरंटी देखील दिली आहे.