29 नोव्हेंबर 2026
created by : atul kamble
टीव्हीएस ज्युपिटर कंपनीच्या पोर्टफोलियोत सर्वाधिक विकली जाणारी स्कूटर आहे. अलिकडेच टीव्हीएस ज्युपिटरने 1 कोटी प्रोडक्शन युनिट्सचे माईलस्टोन गाठले.
TVS कंपनीने ज्युपिटर 125 ला साल 2021 मध्ये लाँच केले होते.तेव्हापासून कंपनीने याच्या डिझाईन आणि फिचर्समध्ये कोणताही बदल केला नव्हता.
आता कंपनी या स्कूटरचा नवा व्हेरिएंट लाँच करु शकते.यात सिंगल चॅनल एबीएस फिचर दिले जाऊ शकते.
कंपनीचा हा सर्वात महागडा व्हेरिएंट होऊ शकतो.अलिकडेच या स्कूटरच्या एबीएस व्हेरिएंटला डीलरशिपकडे पोहचताना पाहिले गेले आहे.
टीव्हीएस ज्युपिटर 125 सध्या चार व्हेरिएंटमध्ये येते.याच्या रेंज टॉपिंग व्हेरिएंट स्मार्टएक्सोनेक्टची किंमत 91,235 रुपये एक्स शोरुम आहे.
टीव्हीएस रेडर आणि सुझुकी एक्सेस 125 चे उदाहरण पाहिले तर या एबीएस व्हेरिएंटची किंमत स्टँडर्ड व्हेरिएंटच्या तुलनेत 4 ते 7 हजार रुपये जास्त असेल.
टीव्हीएस ज्युपिटर 125 एबीएसमध्ये स्मार्टएक्सोनेक्ट सारखे टीएफटी डिस्प्ले मिळणार नाही. यात एसएक्ससी व्हेरिएंटवाला निगेटिव्ह एलसीडी डिस्प्ले मिळेल.
स्कूटरमध्ये १२४.८ सीसीचे सिंगल सिलिंडर २ व्ही एअर कुल्ड इंजिन मिळेल. जो ८.४४ बीएचपीची पॉवर आणि ११.१ एनएमचा टॉर्क देतो.
या स्कूटरची स्पर्धा होंडा एक्टिव्हा १२५, यामाहा फसीनो १२५ आणि सुझुकी एक्सेसशी होईल.