24 जुलै 2025
Created By: राकेश ठाकुर
VinFast ने आपली VF7 SUV च्या स्पेसिफिकेशन आणि फीचर्सचा खुलासा केला आहे. ही गाडी पुढच्या महिन्यात लाँच होणार आहे.
VinFast VF7 SUV ची बुकिंग कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर 21 हजाराने सुरु झाली आहे. लाँचनंतर खुलासा होईल.
VinFast VF7 SUV मध्ये अनेक अधुनिक फीचर्स आहेत. यात पॅनोरमिक सनरूफ, वायरलेस फोन चार्जिंग आणि 360 डिग्री कॅमेरा सिस्टम या सुविधा आहेत.
VinFast VF7 SUV मध्ये 8 एअरबॅग, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल आणि अधुनिक ड्रायव्हर असिस्टंस सिस्ट आहे. अडॅप्टिव क्रूज कंट्रोल फीचरही आहे.
VinFast VF7 SUV च्या पॉवर आणि बॅटरी माहिती समोर आलेली नाही. पण ग्लोबल वर्जनमध्ये 75.3 किलोवॅटची बॅटरी आहे.
VinFast VF7 SUV ग्लोबल वर्जनची बॅटरी एकदा चार्ज केली की 450 किमी रेंज देते. या गाडीची स्पर्दा महिंद्राच्या XUV.e9 आणि BYD Atto 3 सोबत आहे.
VinFast VF7 SUV तीन प्रकारात आहे. यात अर्थ, वाइंड आणि स्काय आहे. या प्रकारात काय असेल हे काही अजून समोर आलेलं नाही.
VinFast VF7 SUV ही जेट ब्लॅक, डेसज सिल्व्हर, इन्फिनिटी ब्लँक, क्रिमझन रेड, झेनिथ ग्रे आणि अर्बन मिंट रंगात मिळेल.