किती आहे नव्या Seltos ची किंमत ? नव्या रुपात लाँच झालीय...

Created By: Atul Kamble

8 january 2026

 Kia Seltos 2026 : नव्या जनरेशनची Kia Seltos अधिकृतपणे विक्रीसाठी लाँच झाली आहे.तिची सुरुवातीची किंमत १०.९९ लाख रुपये आहे.

 नवीन सेल्टोसची बुकिंग ११ डिसेंबरपासून २५,००० रुपयांच्या टोकन रकमेपासून सुरू झाली, तर डिलिव्हरी जानेवारीच्या मध्यात सुरू होईल.तिची किंमत १९.९९ लाखांपर्यंत जाते.

 2026 चे सेल्टोसचे मॉडेल जुन्या मॉडेलपेक्षा जास्त शार्प आणि बॉक्सी दिसते.हिचा इंटेरियर जास्त प्रीमियम आहे.यात जुन्या प्रमाणे तीन इंजिनाचे पर्याय आहेत.

 नव्या सेल्टोसमध्ये कियाची ओपोझिट युनायटेड डिझाईन फिलॉसफी आत्मसात केली आहे. याच रुंद ग्रिल दिली आहे.ज्यात मेन हेडलाईट्स आहेत.

साईजचा विचार केला तर नव्या सेल्टोसची लांबी 4,460mm, रुंदी 1,830mm, उंची 1,635 आहे तर हिचा व्हीलबेस 2,690mm आहे.

आतल्या बाजूला सेल्टोसला दोन नवीन १२.३ इंचाचे डिस्प्ले दिलेले आहेत. ज्यात ५ इंचाचा hvac स्क्रीन आहे.

यात नवीन थ्री-स्पोक फ्लॅट-बॉटम स्टीअरिंग व्हील मिळते. ज्यावर कियाचा थोडो हटके लोगो आहे.

नव्या सेल्टोसमध्ये एंबिएंट लाईटींग, क्लायमेटकंट्रोल, ADAS, 360-डिग्री कॅमेरे आणि सनरुफ सारखे फिचर्स आहेत.