Created By: Atul Kamble
08 May 2026
Ertiga कार खरेदीसाठी महिना पगार किती हवा ?
मारुती सुझुकीची एर्टिगा कार भारताची सर्वात लोकप्रिय 7 आसनी फॅमिली कारपैकी एक आहे.
ertiga कारची ऑन रोड किंमत दिल्ली सारख्या शहरात सुमारे 9.82 ते 14.98 लाखापर्यंत जाऊ शकते.
एर्टिगा खरेदीसाठी तुमचे मासिक उत्पन्न किमान 50 ते 60 हजार असायला हवे.
कारच्या किंमतीच्या 10 ते 20 टक्के म्हणजे 1.5 ते 2 लाखापर्यंत डाऊन पेमेंट करणे योग्य ठरु शकते
5 वर्षाच्या काळाच्या 9 लाखाच्या लोनवर 18 ते 21 हजाराचा मासिक हप्ता पडू शकतो.
तुमचे ईएमआय तुमच्या टेक-होम सॅलरीच्या 20 ते 25 टक्क्यांहून जास्त असू नये असे अर्थतज्ज्ञांचे म्हणणे आहे.यात ही कार बसते.
जर तुम्ही बेस व्हेरिएंट घेत असाल तर कमी उत्पन्नात ( 40 ते 45 हजार ) देखील भागू शकते.
जर तुम्ही सीएनजी व्हेरिएंट घेतले तर पेट्रोलच्या तुलनेत दर महिन्याचा 3 ते 4 हजार रुपयांचा इंधन खर्च वाचेल.
तुम्ही तुमच्या मासिक उत्पन्नाची 30 ते 35 टक्के रक्कमच कारवर खर्च केली तर घरातील उर्वरित खर्चावर पैसा उरेल.
Jio चा 98 दिवसांचा रिचार्ज, यात मिळते बरेच काही