भारतातल्या 5 सर्वात स्वस्त बाईक कोणत्या ?
13 April 2026
भारतात बजेट बाईक्सची मागणी सातत्याने होतच असते. खासकरुन त्या लोकांसाठी जे कमी खर्चात शानदार मायलेज आणि मजबूती मिळवू इच्छीतात.
TVS Sports ES देशाची सर्वात स्वस्त बाईक आहे.हीची किंमत सुमारे 55,500 रुपयांपासून सुरु होते.
Hero HF Deluxe ची किंमत सुमारे 58,800 रुपयांपासून सुरु होते.ही बाईक मजबूत इंजिन आणि पेट्रोल वाचवणारी i3S टेक्नॉलॉजीसाठी ओळखली जाते.
Hero ची HF 100 सुमारे 59,800 रुपयात येते. ही या कंपनीची सर्वात स्वस्त आणि टीकाऊ बाईक्सपैकी एक आहे.
Honda Shine 100 सुमारे 65,000 रुपयांना येते.कमी पैशात होंडाचा स्मुथ अनुभव पाहिजे तर ही एक चांगली चॉईस आहे.
Bajaj Platina 100 सुमारे 69,000 रुपयांना मिळते. Comfortec सस्पेंशनसोबत, खराब रस्त्यावर देखील ही आरामात चालते.
या बाईक्सच्या किंमती एक्स शोरुमच्या आहे. रस्त्यावर उतरल्यानंतर याची किंमत वाढू शकते.त्या-त्या राज्यातील करानुसार किंमत वेगवेगळी होते.
आंबट ढेकर येण्यास हे 5 पदार्थ असतात जबाबदार