26 जून 2025
Created By: राकेश ठाकुर
दिल्लीत आता इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग सुलभ झालं आहे. कारण दिल्ली सरकारच्या स्विच दिल्ली पोर्टल ev.delhi.gov.in आणि अॅपच्या माध्यमतून काही सेकंदात माहिती मिळेल.
या पोर्टलवर लोकेशन, डायरेक्शन, चार्जिंग कॅटेगरी याची माहिती मिळेल. इतकंच काय तर कोणतं स्टेशन रिकामी आहे याबाबतही माहिती मिळेल.
याशिवाय जस्ट डायल, 1 चार्जिंग सारख्या पोर्टलवरूनही तुम्हाला माहिती मिळेल.
तसेच लोकेशन शोधण्यासाठी गुगल मॅपवरही ईव्ही चार्जिंग स्टेशन नियर मी सच्रच करू शकता.
दिल्लीत राजघाट, आयपी एस्टेट, नेहरू प्लेस, कालकाजी, महरौली आणि द्वारका सेक्टरमध्ये चार्जिंग सुविधा आहे.
एनसीआरच्या गुरुग्राम सेक्टर 52 मध्ये सर्वात मोठं चार्जिंग स्टेशन आहे. येथे एकत्रित 100हून अधिक वाहनं चार्ज केली जाऊ शकतात.
फास्ट चार्जिंगसाठी 10 रुपये प्रति युनिट आणि स्लो चार्जिंगसाठी 3 रुपये प्रति युनिट आहे.