तुम्ही आणत असलेलं खोबरेल शुद्ध आहे की भेसळयुक्त, कसे ओळखाल?

10 August 2025

Created By: मयुरी सर्जेराव

नारळाच्या तेलाच्या वाढत्या मागणीमुळे, आता अनेक ठिकाणी त्यात भेसळ केली जात आहे.

भेसळयुक्त खोबरेल तेल केसांना, त्वचेला हानी पोहोचवू शकते.  खरे खोबरेल तेल कसे ओळखायचे?

एक ग्लास पाण्यात एक चमचा नारळ तेल टाका, ते 30 मिनिटे तसेच राहू द्या. तेल पाण्यात मिसळलं तर ते बनावट असू शकते.

नारळाचे तेल 1 तास फ्रिजमध्ये ठेवा. जर ते खरे असेल तर ते चांगले घट्ट होईल. भेसळयुक्त असेल घट्ट होणार नाही.

पॅनमध्ये मध्यम आचेवर एक चमचा खोबरेल तेल गरम करा. जर त्यात बुडबुडे निघाले,जळल्यासारखा वास आला तर ते बनावट असू शकते.

नारळाच्या तेलाच्या बाटलीवरील लेबल तपासा. जर लेबलवर व्हर्जिन, कोल्ड प्रेस्ड, अनरिफाइंड असे असेल, तर ते खरे तेल आहे.