19 नोव्हेंबर  2026

Created By:  Bhakti Gothankar

ना मेकअपची गरज, ना महागड्या कपड्यांची… फक्त कपड्याचा योग्य  रंग निवडा आणि दिसा स्टायलिश

स्किन टोननुसार कपड्यांचे  रंग कसे निवडावेत?   योग्य रंगांची निवड केल्यास तुमचा चेहरा  अधिक फ्रेश, ग्लोइंग आणि आकर्षक दिसतो.

सर्वप्रथम तुमचा स्किन टोन ओळखा :  फेअर, व्हीटिश, डस्की किंवा डीप यापैकी तुमचा  स्किन टोन कोणता आहे ते ओळखा. त्यासोबत  अंडरटोन (कूल, वॉर्म किंवा न्यूट्रल) माहित  असल्यास रंग निवडणे अधिक सोपे होते.

फेअर स्किन टोनसाठी रंग : एमराल्ड ग्रीन, रॉयल ब्लू, वाइन, मॅरून, पर्पल,  लॅव्हेंडर आणि पेस्टल शेड्स उत्तम दिसतात. खूप  फिकट बेज किंवा स्किनसारखे रंग टाळल्यास लूक  अधिक उठून दिसतो.

व्हीटिश स्किन टोनसाठी रंग: मस्टर्ड, ऑलिव्ह ग्रीन, टील ब्लू, रस्ट, पीच, कोरल,  प्लम आणि चॉकलेट ब्राउन रंग त्वचेचा नैसर्गिक ग्लो वाढवतात. ऑफ-व्हाईटही चांगला पर्याय ठरतो.

डस्की स्किन टोनसाठी रंग: व्हाईट, फ्युशिया, रेड, कोबाल्ट ब्लू, ऑरेंज, मॅजेंटा,  पर्पल आणि गोल्डन शेड्स खूप आकर्षक दिसतात.  हे रंग त्वचेचा टोन अधिक उठावदार दाखवतात.

डीप स्किन टोनसाठी रंग: यलो, लाइम ग्रीन, टर्कॉईज, एमराल्ड ग्रीन,  ऑफ-व्हाईट, बर्न्ट ऑरेंज, मेटॅलिक गोल्ड आणि  सिल्व्हर शेड्स सुंदर दिसतात. ब्राइट रंग  आत्मविश्वासपूर्ण लूक देतात.

अंडरटोननुसार रंग निवडा: कूल अंडरटोन – नेव्ही ब्लू, बेरी, पिंक, लॅव्हेंडर,  सिल्व्हर, वॉर्म अंडरटोन – मस्टर्ड, ब्राउन, ऑलिव्ह, ऑरेंज, गोल्ड, न्यूट्रल अंडरटोन – बहुतेक सर्व  रंग सहज खुलून दिसतात.

प्रसंगानुसार रंग निवडा: ऑफिससाठी नेव्ही, ग्रे, बेज आणि पेस्टल रंग योग्य ठरतात. पार्टीसाठी रेड, ब्लॅक, एमराल्ड ग्रीन किंवा मेटॅलिक शेड्स निवडा. उन्हाळ्यात हलके तर  हिवाळ्यात गडद रंग अधिक आकर्षक दिसतात.

रंगांचे योग्य कॉम्बिनेशन करा: एकाच रंगाच्या वेगवेगळ्या शेड्स वापरा किंवा  कॉन्ट्रास्ट रंगांची जोड द्या. उदाहरणार्थ, व्हाईटसोबत  ब्लू, ब्लॅकसोबत रेड, बेजसोबत ऑलिव्ह किंवा डेनिमसोबत पेस्टल रंग सुंदर दिसतात.

या चुका टाळा: स्किन टोनशी अगदी मिळतेजुळते रंग टाळा. खूप  निऑन रंगांचा अतिरेक करू नका. कपड्यांचा रंग निवडताना मेकअप, अॅक्सेसरीज, केसांचा रंग आणि फुटवेअर यांचाही विचार करा. योग्य रंगांची निवड  केल्यास तुमचा संपूर्ण लूक अधिक स्टायलिश आणि आत्मविश्वासपूर्ण दिसेल.