दाढी वाढत नाहीये? महागड्या प्रोडक्ट्सपूर्वी या गोष्टी करून पाहा; फरक पडू शकतो!

17 ऑक्टोबर  2026

Created By: Sunil Late

दाढी वाढत नसल्याची समस्या अनेक तरुणांमध्ये दिसून येते. त्यासाठी ते अनेक उपाय करतात. पण काही फरक पडत नाही. 

मात्र, दाढीच्या केसांची योग्य निगा राखण्यासाठी काही गोष्टी उपयोगी ठरू शकतात. नेमक्या कोणत्या सवयी ठेवाव्यात?

 केस प्रामुख्याने केराटिन नावाच्या प्रथिनापासून बनतात. त्यामुळे आहारात अंडी, चिकन, डाळी, पनीर आणि सोयाबीन यांसारख्या प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश करावा.

व्हिटॅमिन व मिनरल्स व्हिटॅमिन आणि मिनरल्सचा आहारात समावेश करा. व्हिटॅमिन डी, ए, बी, सी आणि ई केसांच्या वाढीसाठी आवश्यक आहेत.

पुरेशी झोप आणि व्यायाम नियमित व्यायाम आणि पुरेशी झोप रक्तातील संप्रेरकांची पातळी वाढवतात, ज्यामुळे केसांची वाढ चांगली होते.

दाढी नियमितपणे ट्रिम केल्याने ती दाट आणि चांगली वाढते. चेहऱ्यावरील त्वचेला स्वच्छ ठेवल्याने केसांची वाढ चांगली होते.