27 नोव्हेंबर 2026
Created By: Bhakti Gothankar
कोपर आणि गुडघे काळे का होतात या भागांची त्वचा जाड असल्याने तसेच सतत घर्षण, कोरडेपणा आणि सूर्यप्रकाशामुळे कोपर आणि गुडघे काळवंडलेले असतात
रोज मॉश्चराईझर लावा अंघोळीनंतर कोपर आणि गुडघ्यांवर मॉश्चराईार लावा. त्वचेतील ओलावा टिकून राहिल्याने कोरडेपणा कमी होण्यास मदत होते.
अॅलोवेरा जेल वापरून पाहा त्वचा कोरडी होते म्हणून काळी पडते. त्यामुळे त्यावर अग्लोवेरा जेल लावा. यामुळे त्वचेला मॉइश्चर मिळण्यास मदत होऊ शकते
लिंबू आणि मध लिंबात मध मिसळून 15 मिनिटे पेस्ट कोपर आणि गुडघ्यांवर लावा. यामुळे त्वचेतील मेलेनिन कमी होईल आणि त्वचा उजळेल.
नारळाचे तेल नारळाच्या तेलात व्हिटॅमिन ई असते त्यामुळे रंग सुधारण्यास मदत होते. नारळाच्या तेलाने रोज रात्री कोपरांवर आणि गुडघ्यांवर मालिश करा
(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)