16 ऑक्टोबर 2026
Created By: Bhakti Gothankar
चांदीची पैंजण रोज वापरल्यामुळे काही दिवसांनी काळी पडते किंवा तिची चमक कमी होते. धूळ, घाम आणि ओलाव्यामुळे चांदीवर काळसर थर जमा होतो. पण यासाठी लगेच सोनाराकडे जाण्याची गरज नाही. काही सोप्या घरगुती उपायांनी पैंजण स्वच्छ करता येऊ शकतात.
कोमट पाणी आणि साबण एका भांड्यात कोमट पाणी घेऊन त्यात सौम्या साबण मिसळा. पैंजण काही मिनिटे त्यात भिजवून ठेवा. त्यानंतर मऊ कापडाने किंवा मऊ ब्रश घेऊन हलक्या हाताने स्वच्छ करा.
बेकिंग सोडा पैंजणवर बेकिंग सोड्याची पेस्ट पातळ पेस्ट लावा, स्वच्छ धुवून मऊ कापडाने पुसून घ्या. काळे पडलेले पैंजण काही मिनिटांतच चमकतील.
अॅल्यूमिनिअम फॉइलचा वापर अॅल्यूमिनिअम फॉइल आणि बेकिंग सोडा गरम पाण्यात मिसळा त्यात पैंजण भिजवून ठेवा. यामुळे पैंजणावरचा काळेपणा दूर होतो आणि पैंजण चमकू लागतात
डिश वॉशिंग लिक्क्विड एक भांड्यात कोमट पाणी घेऊन त्यात डिश वॉशिंग लिक्क्विड टाका. यात 10 मिनिटे पैंजण भिजवून ठेवा नंतर मऊ ब्रशने स्वच्छ करा
फॉईल पेपर आणि मीठ एका भांड्याला आतून अॅल्यूमिनियम फॉईल लावा. त्यात कोमट पाणी, एक चमचा मीठ आणि एक चमचा बेकिंग सोडा टाका. 10 मिन. पैंजण ठेवा. काही वेळातच पैंजण चमकू लागतील.
मऊ कापडाने पुसण्याची सवय पैंजण वापरून झाल्यावर ती मऊ कापडाने पुसण्याची सवय लावा. यामुळे धूळ , घाम,ओलावा निघून जाईल आणि पैंजण काळे पडणार नाहीत