आम्ही आज तुम्हाला दिग्गज अभिनेत्री नीलिमा अझीम यांची माहिती देणार आहोत

6 December 2023

Created By: Chetan Patil

नीलीमा यांचा जन्म प्रसिद्ध उर्दू लेखक अनवर नजीम यांच्या घरी झाला

नीलिमा या 1979-80 च्या काळात प्रसिद्ध अभिनेत्री होत्याच, यासोबत त्या कथक डान्सरही होत्या

नीलिमा यांचं वैवाहिक आयु्ष्य नेहमी चर्चेला कारण ठरलं. नीलिमा यांनी पहिलं लग्न प्रसिद्ध अभिनेते पंकज कपूर यांच्याशी केलं.

नीलिमा यांनी वयाच्या 16 व्या वर्षी पहिलं लग्न केलं. लग्नानंतर तीन वर्षांनी त्यांनी बाळाला जन्म दिला.

त्यांचा हाच मुलगा आज चित्रपटसृष्टीतला नामांकीत अभिनेता शाहीद कपूर आहे.

शाहीदच्या जन्मानंतर नीलिमा आणि पंकज यांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. त्यामुळे त्यांनी घटस्फोट घेतला

नीलिमा यांनी नंतर अभिनेते राजेश खट्टर यांच्यासोबत लग्न केलं. पण हे नातंही 11 वर्षच टिकलं.

दाम्पत्याला इशान खट्टर हा मुलगा आहे, ज्याने धडक चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलंय.

राजेश खट्टर यांच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर नीलिम यांनी रझा अली खान यांच्याशी तिसरं लग्न केलं. पण ते लग्न फक्त पाच वर्ष टिकलं.

2004 ते 2009 या दरम्यान नीलिमा आणि रझा अली खान हे पती-पत्नी होते.

नीलिमा यांना वैयक्तिक आयुष्यात अनेक अडचणी आल्या, पण त्या धैर्याने चालत राहिल्या.