पती असावा तर असा, पत्नीला IPS बनवलं

2 December 2023

Created By: Chetan Patil

UPSCची परीक्षा सोपी नसते. या परीक्षेत अनेकांना वारंवार अपयश येतं.

IPS अनुकृती शर्मा या त्यापैकीच एक आहेत. अनुकृती यांनी चारवेळा परीक्षा दिलीय.

पहिल्यांदा अनुकृती मेन्सपर्यंत पोहोचल्या. तर दुसऱ्या प्रयत्नात प्रिलियम्सही पास होऊ शकल्या नाहीत.

तिसऱ्या प्रयत्नात त्या प्रिलियम आणि मेन्स पास होण्यात यशस्वी झाल्या. पण मुलाखतीत पास होऊ शकल्या नाहीत.

तीनवेळा हाती आलेली संधी गेली त्यामुळे अनुकृती निराश झाल्या. पण त्यांच्या पतीने त्यांना मोटिवेट केलं

अनुकृती यांनी 2019 मध्ये UPSC CSE परीक्षा दिली. यावेळी त्या पास झाल्या.

अनुकृती अखेर IPS बनल्या. त्या आपल्या यशाचं श्रेय पतीला देतात.