ही अभिनेत्री करणार होती सलमान खानशी लग्न,मग कुठं बिनसलं?

26 June 2025

Created By: Atul Kamble

सलमान आणि संगीता बिजलानी यांची भेट १९८६ मध्ये वांद्रे येथील हॉटेल सी- रॉकच्या एका पार्टीत झाली.

त्याकाळी संगीता बिजलानी हिचे मॉडेलिंगच्या दुनियेत मोठे नाव होते.एका टीव्ही जाहीरातीच्या सेटवर दोघांमध्ये जवळीक वाढली

सलमान आणि संगीता १९८६ ते १९९४ पर्यंत एकमेकांना डेट करीत होते. सलमानच्या आयुष्यातील हे सर्वात प्रदीर्घ अफेअर होतं

दोघांचे लग्न १९९४ मध्ये ठरलं,पत्रिकाही छापल्या होत्या.सलमानने 'कॉफी विथ करण'मध्ये हे खरं असल्याचं म्हटलं होतं

लग्नाच्या तारखेआधीच संगीताने नाते तोडले.जासिम खान यांच्या 'बीईंग सलमान' या पुस्तकात अभिनेत्री सोमी अलीशी सलमानच्या जवळीकीने हे नातं तुटल्यांचं म्हटलं आहे.

सलमानशी ब्रेकअप झाल्यानंतर संगीताने 1996 मध्ये क्रिकेटर अझरुद्दीनशी लग्न केले, संगीताने धर्म बदलून आयशा नाव ठेवले. परंतू २०१० मध्ये तलाक झाला

ब्रेकअपनंतरही सलमान आणि संगीता चांगले मित्र आहेत. संगीता अनेकदा सलमानच्या घरच्या कौटुंबिक पार्ट्यांना दिसत असते. 

संगीता बिजलानी माजी मिस इंडिया (१९८०) असून तिने त्रिदेव,जुर्म,योद्धा सारख्या चित्रपटात काम केले आहे.