काय होती औरंगजेबाची शेवटची इच्छा, पार्थिव महाराष्ट्रात का आणलं?
Created By: Shweta Walanj
माझ्या कब्रवर कोणताच मकबरा नकोय आणि माझ्या चेहऱ्याला कफनमध्ये झाकू नका... ही औरंगजेबाची शेवटची इच्छा होती.
मत्यूनंतर त्याच्या कब्रवर एक चबूतरा बांधण्यात यावा आणि अत्यंविधीसाठी शाही खजान्याचा वापर करायचा नाही. अशीदेखील त्याची इच्छा होती.
शेवटच्या घटिका मोजत असतना औरंगजेबाने मुलाला पत्र लिहिलं होतं. 'मी टोप्या विणून 4 रुपये 2 आणे कमावले आहेत. त्यातून माझे अंत्यविधी करायच्या' असं पत्रात लिहिलं होतं.
'कुरान लिहून त्याच्या प्रति विकून 305 रुपये कमावले आहेत. हे पैसे काझी आणि गरिबांमध्ये वाटण्यात यावे...' असं देखील पत्रात लिहिलं होतं.
मृत्यूनंतर कोणताच शाही कार्यक्रम किंवा कब्रवर कोणतीच पक्की इमारत बांधायची नाही.. असं देखील औरंगजेबाने सांगितलं होतं.
त्याची एक इच्छा होती की दफन करताना त्याचा चेहरा झाकला जाऊ नये कारण त्याला त्याच्या अल्लाहला उघड्या चेहऱ्याने सामोरं जायचं होतं.
3 मार्च 1707 रोजी दख्खनहून दिल्लीला परतत असताना औरंगजेबाचा मृत्यू झाला. औरंगजेबाचा मृतदेह दिल्लीत नेण्यात आला नाही तर तो महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यात नेण्यात आला.
कारण ज्या ठिकाणी त्याचा मृत्यू झाला त्याच ठिकाणी त्याचा मृतदेह दफन करावा अशी औरंगजेबाची इच्छा होती.
माझ्या कब्रवर कोणताच मकबरा नकोय आणि माझ्या चेहऱ्याला कफनमध्ये झाकू नका... ही औरंगजेबाची शेवटची इच्छा होती.
हे सुद्धा वाचा | दारु विकून कोट्यवधी रुपये कमवतो शाहरुख खानचा मुलगा