बिग बींनी विकला फ्लॅट, एका  झटक्यात कमविले ५२ कोटी रुपये

20 जानेवारी 2025

 बिग बींनी अलिकडेच मुंबईतील आपला फ्लॅट विकून तगडी कमाई केली आहे

 

बिग बींनी ओशिवरातील क्रिस्टल ग्रुपच्या रेसिडेंन्शियल प्रोजेक्ट 'द अटलांटिस'मधील आपला डुप्लेक्स अपार्टमेंट विकला आहे

बच्चन यांनी ५,१८५.६२ वर्गमीटर कार्पेट एरियाचा लक्झरी फ्लॅट ८३ कोटींना विकला आहे

या डुप्लेक्स अपार्टमेंट ४४५.९३ वर्गमीटर पसरलेल्या छतासह सहा कारचा पार्किंग एरिया आहे

 बिग बींनी एप्रिल २०२१ मध्ये हे अपार्टमेंट ३१ कोटी रुपयात खरेदी केले होते.तो विकून ५२ कोटी कमावलेत

हा करार जानेवारी २०२५ मध्ये रजिस्टर्ड झाला होता,यासाठी ४.९८ कोटीची स्टँप ड्यूटी ३० हजार रुपयांचा रजिस्ट्रेशन चार्ज भरला होता

 हे अपार्टमेंट बच्चन यांनी खरेदीकेल्यानंतर नोव्हेंबर २०२१ पासून बॉलीवूड अभिनेत्री कृति सेनन हिला भाड्याने दिले होते.

बिग बींनी मुंबईत गुंतवणूक वाढविली आहे.गेल्यावर्षी जून २०२४ मध्ये अंधेरी प. येथील ६० कोटींची तीन मालमत्ता खरेदी केली

२०२३ मध्ये याच इमारतीत २९ कोटींची खरेदीदारी केली होती

बिग बी यांनी अभिषेक बच्चन सोबत मुलुंडमध्ये ओबेरॉय इटरनिया नामक एक योजनेत २४.९५ कोटीचे १० अपार्टमेंट खरेदी केले