छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर बनलेला छावा चित्रपटाची जोरदार चर्चा आहे.

22 February 2025

छावामध्ये अक्षय खन्ना याने औरंगजेबची भूमिका करत सर्वांचे लक्ष वेधले. त्याच्या जबरदस्त अभिनयाचे कौतूक होत आहे. 

छावामध्ये औरंगजेबच्या भूमिकेसाठी अक्षय खन्ना याला दोन कोटी रुपये मिळाल्याचे सांगितले जात आहे. 

अक्षय खन्नाने औरंगजेबची भूमिका साकारली आहे. आता बॉबी देओलसुद्धा औरंगजेब बनून मोठ्या पडद्यावर एन्ट्री करणार आहे. 

28 मार्च रोजी ‘हरि हरा वीरा मल्लू’ चित्रपट येणार आहे. पवन कल्याण याच्या या चित्रपटात बॉबी देओल औरंगजेब बनला आहे. 

बॉबी देओलच्या वाढदिवशी त्याचा खूंखार लुक समोर आला होता. त्याचा हा लूक अनेकांना आवडला.

showbizgalore डॉट कॉमनुसार या चित्रपटासाठी बॉबी देओल याला 3 कोटी रुपये मानधन मिळाले आहे. 

आता बॉबी देओल अन् अक्षय खन्ना दोघे औरंगजेबच्या भूमिकेत दिसत आहे. अक्षय खन्नाप्रमाणे बॉबी देओलची भूमिका गाजणार असल्याचे दिसत आहे.