सकाळी लवकर उठण्याचे अनेक फायदे आहेत. आरोग्य अन् चांगल्या दिनचर्यासाठी सकाळी लवकर उठणे गरजेचे आहे. 

22 February 2025

अनेकांना सकाळी लवकर उठावे, असे वाटते. परंतु ते ठरवल्यानंतर लवकर उठू शकत नाही. 

आळसामुळे जे लोक लवकर उठू शकत नाही, त्यांच्यासाठी राधा राणीचे भक्त प्रेमानंद महाराज यांनी टीप्स दिल्या आहेत.

उशीरापर्यंत जागणे आणि सकाळी उशीरापर्यंत झोपणे ही सवय चुकीची असल्याचे प्रेमानंद महाराज यांनी म्हटले आहे. 

सकाळी उशीरापर्यंत झोपल्यामुळे सकाळी करण्यात येणारे भजन-कीर्तन करु शकत नाही. 

सकाळी लवकर उठल्यावर झोप येत असेल तर आपल्याबरोबर जप माळ घेऊन फिरण्यासाठी जावे. त्यामुळे भगवतांचे नामस्मरण सुद्धा होते आणि फिरणेसुद्धा होते. 

सलग एक महिना एकाच वेळेला उठल्यावर ती गोष्टी तुमची सवय बनेल. त्यानंतर तुम्ही स्वत: सकाळी लवकर उठाला.

एक महिना म्हणजे 30 दिवस कोणतीही गोष्ट केल्यास ती सवय बनते, हे विज्ञानाने सिद्ध केले आहे.