प्रेग्नेंसी आणि डिलीव्हरीबद्दल दीपिका पादुकोणने केलाय मोठा खुलासा
09 May 2025
Created By: Shweta Walanj
दीपिका पादुकोणहिने 2024 मध्ये गोंडस मुलीला जन्म दिला.
दीपिका आणि रणवीर यांनी त्यांच्या मुलीचं नाव दुआ असं ठेवलं आहे.
नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अभिनेत्री प्रेग्नेंसी आणि डिलिव्हरीबद्दल मोठा खुलासा केला.
'8 व्या आणि 9 व्या महिन्यात मला प्रचंड वेदना झाल्या. डिलिव्हरी दरम्यान देखील त्रास झाला.'
'शरीरातील प्रत्येक भागात होणाऱ्या वेदना तिव्र होत्या. योग करत असताना देखील मला त्रास झाला.'
'रणवीरने पूर्ण निर्णय माझ्यावर सोपवला होता. मला कधीच आई होण्यासाठी कोणी दबाव टाकला नाही...' असं देखील दीपिका म्हणाली.
हे सुद्धा वाचा - 'माधुरी स्त्री म्हणून वाईट, तिने माझ्या बहिणीचा संसार मोडला...'