लग्नात कशी दिसत होती मनीषा कोईराला, लग्नाचे Unseen फोटो व्हायरल

11 June 2025

Created By: Shweta Walanj

मनीषा कोईराला हिने एकापेक्षा एक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं.

बॉलिवूडमध्ये टॉप अभिनेत्री असताना मनीषाने नेपाळी उद्योजक सम्राट दहल याच्यासोबत लग्न केलं.

मनीषाचं लग्न 2 वर्ष देखील टिकलं नाही. 2012 मध्ये मनीषा आणि सम्राट यांचा घटस्फोट झाला.

मनीषा म्हणाली, 'माझा नवराच माझा सर्वात मोठा शत्रू झाला. माझ्या आयुष्यात पुरुषाचं प्रेमच नाही...'

घटस्फोटनंतर मनीषा कर्करोगाच्या विळख्यात अडकली. परदेशात अभिनेत्री उपचार घेतले.

गंभीर आजारावर मात केल्यानंतर मनीषाने पुन्हा नव्याने आयुष्य जगायला सुरुवात केली आहे.