'करियर संपून जाईल...'महेश भट्ट यांनी इमरान हाशमीला का दिला होता इशारा

9 october 2025

Created By: Atul Kamble

इमरान हाशमीला सिरीअल किसर म्हटले जात होते. परंतू तरीही त्याने विविध प्रकारच्या भूमिका साकारात स्वत:चे स्थान निर्माण केले

 त्याने त्याच्या करिअर एकाहून एक सरस भूमिका केल्या.निर्माता -दिग्दर्शक महेश भट्ट यांच्या सोबत त्यांनी अनेकदा काम केले

इमरानने एका मुलाखतीत महेश भट्ट यांनी दिलेल्या इशाऱ्याबाबत सांगितले होते,काय होता हा इशारा ?

'वन्स अपॉन ए टाईम इन मुंबई'या दाऊदच्या जीवनावरील चित्रपटात इमरानने शोएब खानचे कॅरेक्टर साकारले होते

चाहत्यांना इमरानची ही भूमिका खूप आवडली होती.परंतू महेश भट्ट इमरानवर एका बाबीमुळे नाराज झाले.त्यांना एका गोष्टीची भीती होती

महेश भट्टना भिती होती की इमरानने ही भूमिका केल्याने त्याच्या इमेजवर याचा परिणाम होईल

 महेश भट्ट म्हटले होते की हे कॅरेक्टर जर मी केले तर माझे करियर समाप्त होईल,परंतू मी भूमिका केली आणि चित्रपट हीट झाला