2009 मध्ये असं काय झालं होतं, ज्यामुळे रिहानाला प्रेमाची वाटू लागली होती भीती?

Created By: Shweta Walanj

हॉलिवूड सिंगर रिहाना गेल्या काही दिवसांपासून अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंगमुळे चर्चेत आहे.

रियाना कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. एककाळ असा होता जेव्हा रिहाना बॉयफ्रेंडमुळे चर्चेत आली होती. 

सिंगर क्रिस ब्राउन याच्यासोबत असलेल्या नात्यामुळे रिहाना चर्चेत होती. क्रिसने रिहानाला गाडीत मारहाण केली होती. 

क्रिसने मारहाण केल्यामुळे रिहानाचा चेहरा सुजला होता. तिचे ओठ देखील फाटले होतं. ज्यामुळे रिहाना रक्त बंबाळ झाली होती. याचा खुलासा खु्द्द क्रिसने केला होता.

ज्यामुळे रिहाना आणि क्रिस यांचं नातं तुटलं. एक्ट्रा अफेअरमुळे दोघांमध्ये वाद झाले होते. 

एवढंच नाहीतर, क्रिसने मारहणा केल्याचे रिहानाचे फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होतेय.