'हीरो नंबर 1', गोविंदाला या अवस्थेत पाहून चाहत्यांना धक्का

Created By: Atul Kamble

31 january 2026

 गोविंदा ९० च्या दशकातील बॉलीवूडचा राजा होता.परंतू आता त्याचे दर्शन सिल्व्हर स्क्रीनवर दुर्मिळ झाले आहे.

गोंविदाच्या खाजगी आणि प्रोफेशनल लाईफच्या अनेक वावड्या उडत आहेत. त्यातील काही खऱ्या काही खोट्याही आहेत.

आता सोशल मीडियावर गोविंदा असा व्हिडीओ व्हायरल होत आहे.तो पाहून चाहत्यांना धक्का बसला आहे.

व्हिडीओत बॉलीवूडचा 'हीरो नंबर 1'गोविंदा उत्तर प्रदेशात एका हुंडई ऑरा कारमध्ये बसताना दिसत आहे.

गोविंदा शुटींगसाठी गेला होता की दुसऱ्या प्रोफेशन कामासाठी गेला होता हे कळले नाही.पण एका साध्या कारमध्ये गोविंदाला प्रवास करताना पाहून चाहते नाराज झाले आहेत.

 गोविंदाला स्वस्तातल्या कारमध्ये फिरताना पाहून चाहत्यांना आपल्या हिरोचा डाऊनफॉल सुरु झाला आहे हे वाटत आहे.

 इतक्या मोठ्या स्टारवर अशी वेळ आली की गोंविदाला न्यायला साधी ऑरा कार आलीय

चाहत्यांच्या हृदयावर अभिनय आणि नृत्याने राज्य करणाऱ्या गोविंदावर ही  वेळ का आली याचा विचार चाहते करत आहेत

 गोविंदाची लवकरच नवी इनिंग सुरु होणार आहे असा संकेत त्याने दिला आहे.चाहते आता त्याच्या पुनरागमाची वाट पहात आहेत.