जेवणानंतर गोड खाण्याची इच्छा होते, या आजाराचे तर लक्षण नाही ना ?
Created By: Atul Kamble
30 january 2026
भारतीय घरात जेवणानंतर काही तरी गोड खाण्याची रित आहे.रात्रीच्या जेवणानंतर गोड खाण्याची तीव्र इच्छा होणे योग्य आहे की अयोग्य ते पाहूयात.
जेवणानंतर गोड खाण्याच्या इच्छेमागे नेमके कारण काय असते? या संदर्भात तज्ज्ञांचे मत काय ?
जेवणानंतर काही लोकांना गोड खाण्याची सवय असते. तर काही लोकांच्या शरीरात काही तरी समस्या असल्याने अशी इच्छा होते असे डाएट कोच तुलसी नितीन यांनी सांगितले.
शुगरची पातळी अनियंत्रित झाल्याने असे होते.जेवणात रिफाईंड कार्ब्स जास्त असल्याने साखरेची पातळी घसरते.त्यामुळे ऊर्जा मिळण्यासाठी शरीर जास्त साखरेची मागणी करते. गोड खाण्याची इच्छा होते.
शरीरात पोषक तत्वांची कमतरता असेल तर आपल्या गोड खाण्याची इच्छा होऊ शकते.
अनेकदा आपल्याला तहान लागलेली असते. मात्र, लोकांना ती भूक वाटते. शरीरात डीहाड्रेशन झाल्याने शरीर गोड मागते.
जास्त थकल्यानंतर शरीर एनर्जी मिळवण्यासाठी गोड पदार्थांची इच्छा तयार करत असते. त्यामुळे गोड खाण्याची क्रेविंग होते.