वजनानुसार आहारात किती प्रोटीन घ्यावे ? 

Created By: Atul Kamble

30 january 2026

 प्रोटीन स्नायू वाढवण्यासाठी मदत करते. बॉडी रिपेअरिंग आणि टिश्यूला मेन्टेन करण्यास मदत करते. आपल्या त्वचा आणि केसांसाठी हे पोषक तत्व असते.

 प्रोटीनची गरज प्रत्येकासाठी वेगवेगळी असते. प्रोटीनची गरज वय,वजन, लिंग आणि फिजीकल एक्टीव्हीटी किती या प्रमाणात प्रोटीनची गरज असते.

प्रोटीनची गरज प्रति व्यक्ती दर kg 0.8 इतकी असते. परंतू फिजिकल एक्टीव्ही व्यक्ती गरज वाढवू शकतात.

डायटीशियनच्या मते फिजिकली जे लोक जास्त एक्टीव्ह आहेत. त्यांना वजनाच्या प्रमाणात दर kg 1 ग्रॅम प्रोटीन घेणे गरजेचे आहे. एथलीट असाल तर त्यांनी 1.6 दर kg प्रोटीनची गरज असते.

 प्रेग्नंट महिलांसाठी गर्भात असलेल्या बाळाच्या वाढीसाठी प्रोटीन घेण्याची गरज असते. डॉक्टरांच्या सल्ल्याने ते प्रोटीन घेऊ शकतात.

 प्रोटीनचे अनेक सोर्स असतात. ज्यात अंडे, मासे, चिकन आणि मटण नॉनव्हेजचे चांगले पर्याय आहे. डेअरी प्रोडक्ट्स,नट्स आणि डाळी व्हेजचे बेस्ट सोर्स आहेत.

गरजेचे पेक्षा जास्त प्रोटीन घेतल्याने हाडे कमजोर होऊ शकतात. वजन वाढू शकत आणि किडनी-लिव्हरवर वाईट परिणाम होऊ शकतो.