40 व्या वयात ही अभिनेत्री बनणार ‘सिंगल मदर’, जुळ्या मुलांसाठी IVF तंत्राची घेतली मदत
05 July 2025
Created By: Atul Kamble
कन्नड अभिनेत्री भावना रमन्ना चाळीशीत आई होणार आहे. तिने सिंगल मदर होण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे
बॉलीवूडमध्ये करण जोहर, तुषार कपूर सिंगर फादर झालेत पण सिंगल मदर होणारी ही पहिली अभिनेत्री आहे
भावनाने इंस्टावर बेबी बंपचा फोटो टाकलाय,ती 6 महिन्यांची प्रेग्नंट आहे.आपण या वयात आई होऊ असे वाटले नव्हतं असं ती म्हणतेय
जेव्हा मी 20-30 वयाची होती तेव्हा माझ्या मनात हा विचार नव्हता, पण चाळीशीची झाली तेव्हा आई होण्याच्या इच्छेस मुरड घालू शकली नाही
मी सिंगल असल्याने आई होण्याचा मार्ग कठीण होता.IVF क्लीनिकने मला रिजेक्ट केले. परंतू डॉ.सुषमा माझ्या मदतीला धावून आल्या
त्यांच्या मदतीने पहिल्याच प्रयत्नात आई बनले.माझ्या कुटुंबाने साथ दिल्याने त्यांची मी आभारी आहे. पण मुलांना वडिलांशिवाय मोठे व्हावे लागेल याचे दु:ख आहे
पण मी मुलांना वाढवण्यात कोणतीही कसर बाकी ठेवणार नाही.मी हे पाऊल कोणाविरुद्ध नाही तर स्वत:चा सन्मानासाठी उचलले आहे.
माझ्या कहानीने एका जरी महिले स्वत:वर विश्वास ठेवण्यास प्रेरणा घेतली तरी पुरेसे आहे. भावना रमन्ना हीने अमिताभ बच्चन यांच्या फॅमिली चित्रपटातही काम केले आहे.