कोल्हापुरी चप्पल घालून करिना कपूरने इटालियन ब्रँड प्राडावर केली टीका
6 July 2025
Created By: मयुरी सर्जेराव
कोल्हापुरी चप्पलची डिझाईन चोरल्याच्या आरोपाखाली इटालियन ब्रँड प्राडा वादात सापडला आहे.
करीना कपूर सध्या लंडनमध्ये सुट्टी घालवत आहे. तिने एक पोस्ट शेअर करून प्राडावर टीका केली.
करीनाने इंस्टावर एक फोटो पोस्ट केला. ती कोल्हापुरी चप्पल घालून ती समुद्रकिनाऱ्यावर बसलेली दिसत आहे.
करीनाने लिहिले, "माफ करा प्राडा नाही... पण माझी मूळ कोल्हापुरी."
प्राडाने त्यांच्या कलेक्शनमध्ये सादर केलेली चप्पल कोल्हापुरी चप्पलसारखी होती
प्राडाने कोल्हापुरीला कोणतेही श्रेय दिले नाही, त्यानंतर लोकांनी या इटालियन ब्रँडला ट्रोल करायला सुरुवात केली
वाद वाढल्यानंतर, ब्रँडने हे डिझाइन कोल्हापुरीपासून प्रेरित असल्याचे मान्य केले.
पावसाच्या पाण्याचे हे प्रभावी उपाय माहित आहेत का?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा