Nepal हिंसेने भावूक झाली मनिषा कोईराला,म्हणाली 'काळा दिवस'

10 september 2025

Created By: Atul Kamble

नेपाळमध्ये अराजक पसरले आहे.सरकारच्या सोशल मीडिया बंदीनंतर उसळलेले आंदोलन थांबता थांबत नाहीए..

१८ ते २८ वर्षांचे युवक रस्त्यांवर उतरुन सरकारविरोधात निदर्शने करत आहेत.संसदेसह अनेक इमारतींना आगी लावल्या आहेत.

या प्रकरणानंतर बॉलीवूड अभिनेत्री मनिषा कोईराला हीने इंस्टाग्रामवर सातत्याने पोस्ट केल्या आहेत

 अभिनेत्रीने नेपाळच्या हिंसेनंतर आपले दु:ख व्यक्त केले आहे.तिने रक्ताने माखलेल्या शूजचा फोटो शेअर केला आहे

मनिषाने कॅप्शनमध्ये लिहीलेय की नेपाळसाठी काळा दिवस आहे... भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवणाऱ्यांना बंदूकीच्या गोळीने उत्तर मिळत आहे

 तिने एक स्टोरी रि-शेअर केलीय,त्यात लिहिलेय की हा सोशल बॅन नाही,भ्रष्टाचाराचा विरोध आहे

वास्तविक मनिषा कोईराला हिचे नेपाळशी कनेक्शन आहे,तिचा जन्म १६ ऑगस्ट १९७० रोजी काठमांडूत झालाय,तिचे आजोबा नेपाळचे पंतप्रधान होते

तर तिचे वडील प्रकाश कॅबिनेट मंत्री होते. तिने नेपाळी चित्रपटातून अभिनयात पदार्पण केले.नंतर बॉलीवूडमध्ये प्रवेश केला