थिएटरमध्ये समांथासोबत नागा चैतन्यचा मधुचंद्राचा सीन पाहून प्रेक्षकांच्या शिट्टया, आरडाओरडा. 

नागा चैतन्य आणि समांथाचा आता घटस्फोट झालाय. स्क्रीनवर प्रेक्षकांना अजूनही त्यांची जोडी आवडते. 

नागा चैतन्य आणि समांथाचा 'मानम' चित्रपट पुन्हा एकदा थिएटरमध्ये रिलीज झालाय. 

2014 मध्ये आलेला 'मानम' चित्रपट पुन्हा एकदा रिलीज करण्यात आला. दिग्दर्शक विक्रम कुमारसोबत नागा चित्रपट पाहण्यासाठी  आला होता.

प्रेक्षकांमध्ये बसून नागा चैतन्य हा चित्रपट पाहत होता. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय. 

मधुचंद्राचा सीन येताच लोकांनी हूटिंग सुरु केली. लोक जागेवर उभे राहून ओरडत होते. त्यावेळी नागा फॅन्सना शांत होण्यास सांगत होता.

तुम्हाला दोघांना एकत्र मिस करतोय असं युजर्सच म्हणण होतं. अनेकांनी हार्टचे  इमोजी बनवले.