परेश रावल यांनी 'हेरा फेरी 3' करण्यास नकार, का घेतला असा निर्णय?
16 मे 2025
Created By: राकेश ठाकुर
अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल या त्रिकुटाच्या हेरा फेरी 3 चित्रपटाची चर्चा होत आहे. पण चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे.
हेरा फेरी 3 मध्ये त्रिकुट पाहायला मिळणार नाही. कारण परेश रावल यांनी हा चित्रपट करण्यास नकार दिला आहे.
बॉलिवूड हंगामाच्या एका रिपोर्टनुसार, निर्मात्यांसोबत क्रिएटिव्ह मतभेद असल्याने परेश रावल यांनी हा चित्रपट सोडला.
रिपोर्टनुसार, परेश रावल यांनी स्वत: ही बातमी कन्फर्म केली आहे. त्यामुळे हेरा फेरी 3 मध्ये दिसणार नाही.
हेरा फेरी बॉलिवूडमधील प्रसिद्ध कॉमेडी फिल्म आहे. या चित्रपटाचा पहिला भाग 2000 साली आला होता.
सहा वर्षानंतर 2006 मध्ये निर्मात्यांनी हेरा फेरी 2 प्रदर्शित केला. या दोन्ही भागात त्रिकुट दिसलं होतं.
परेश रावल यांच्या जागी कोण भाग घेणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या चित्रपटात परेश रावल यांनी बाबुराव गणपतराव आपटेची भूमिका बजावली होती.
तुर्कीच्या झेंड्यातील लाल रंगात कोणाचं रक्त?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा